महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी तर्फे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करून त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल असे वक्तव्य केले या वक्तव्याचा निषेध म्हणून आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आरमोरी येथील भगतसिंग चौकात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती ही महिलांना सन्मान देणारी असून अब्दुल सत्तार यांनी संपूर्ण स्त्री शक्तीचा अवमान केलेला आहे. ज्याप्रमाणे स्वपक्षाशी बेईमानी करून त्यांनी राज्यामध्ये गैर मार्गाने सरकार स्थापन केले त्याचप्रमाणे गैरमार्गाने वक्तव्य करून महिलांचा अवमान करणे हे अशोभणिय कृत्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरमोरी येथील भगतसिंग चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध केला.

या निषेध आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष अमीन लालानी, कार्याध्यक्ष प्रदीप हजारे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ज्योती सोनकुसरे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष ज्योती घुटके, युवती प्रमुख हसीना ठवरे, अनिल आलबनकर, अशोक ठाकरे, संजय मडावी, किशोर राऊत, अरविंद गुरनुले, कृष्णा सरपे, रोहित वाटगुरे, मंगेश मोहुर्ले, निखिल महामंडरे, गंगाधर कुमरे, राहुल वाघ, माधव नारनवरे, महेश निकुरे, अंकुश घोडमारे, अखिल नारनवरे, कीर्तीलाल कुमरे, राकेश वाघ, अनय कुमरे, संपत कुमरे, उत्तम माझी, सुनील मंडल, आकाश मिस्त्री, नितीश हलदर, आशिष सरदार, गौतम सरदार, सुकुमार सरदार, देवेंद्र नैताम, देवेंद्र सोनकुसरे, वैशाली चापले, भारती मेश्राम, करिष्मा मानकर, अश्विनी घोडाम, प्रतिभा मोहुर्ले, मंजुळा खेडकर, माया खेडकर, कांता शेंडे, पारु ठाकरे, विमल मेश्राम, इंदिरा मेश्राम, ताना शेंडे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos