शांतीग्राम येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या हस्ते कबड्डी सामन्याचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : तालुक्यातील शांतीग्राम येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून काल भव्य कबड्डी सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. सदर सामन्याचे उदघाटन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वामी विवेकानंद सांस्कृतिक व क्रीडा मंडळ शांतीग्राम द्वारा आयोजित ह्या कबड्डी स्पर्धेत परिसरातील मोठ्या संख्येत चमूने सहभाग घेतला आहे. तत्पूर्वी शांतीग्राम येथे प्रवेश करताच राजे यांचे लेझीम पथकाद्वारे गावकऱ्यांनी जोरदार स्वागत केले. ह्यावेळी शांतीग्राम तथा परिसरातील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
News - Gadchiroli