कोटगुल येथे पाच दिवसा पासुन बीएसएनएल टॉवर बंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची मुख्यालयापासुन ४० कि. मी. अंतरावर कोटगुल आहे. या परिसरात सात ग्रामपंचायत, शासकिय आश्रम शाळा, पोलीस मदत केंद्र, टिपागड विद्यालय, धनंजय स्मृती विद्यालय, को-ऑपरेटिव्ह बँक, सेतु केंद्र , तलाठी साझा, तसेच या परिसरात ३० ते ३५ गावे येतात. आदि कार्यालय कोटगुल येथे आहेत. तेथील ऑनलाइन कामे ठप्प आहेत़. प्राप्त माहिती नुसार पाच दिवसापासुन कोटगुल क्षेत्र येथे बीएसएनएल टावर बंद असल्यामुळे कोणतेही शासकिय कामे होत नसल्यामुळे शेतकरी व विद्यार्थी यांना कोणतेही काम करता येत नाही. बंद असलेले बीएसएनएल टॉवर तत्काळ सुरू करण्यात या अन्यथा कोटगुल वाशीय जनता आंदोलन करेल अशी मागणी प्रदिप घोडेला, व अनिल जनबंधु उपसरपंच कोटगुल यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
News - Gadchiroli