सिथेंट्रीक ट्रॅकसह विविध खेळांना प्राधान्य देऊन मैदान तयार करण्यासाठी आराखडा सादर करा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर


- पोलीस कवायत मैदान नुतणीकरण कामाचा आढावा
- नगर परिषदेच्या नवीन जलतरण तलावाच्या बांधकामाची पाहणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : पोलिस कवायत मैदानाचे नुतणीकरण करतांना नागपूर व चंद्रपूरच्या धर्तीवर अद्यावत असे सिंथेटीक ट्रॅक तयार करण्यासोबतच विविध खेळाच्या मैदानाचा समावेश असावा. वेळप्रसंगी सार्वजनिक कार्यक्रम घेता यावे साठी प्रेक्षक गॅलरीसह विशेष आसन व्यवस्थेचा अंतर्भाव करुन आराखडा तयार करावा, अशा सुचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.
पोलिस कवायत मैदानाच्या नुतणीकरण कामाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. यावेळी पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस उपअधिक्षक (गृह) पुंडलीक भटकर, स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद चौधरी, सायवर सेलचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष चिलांगे आदी उपस्थित होते.
पोलिस भरतीप्रसंगी उमेदवारांची एकाच ठिकाणी भरती प्रक्रिया राबविता येईल यादृष्टीने ४००, मीटर १०० मीटर धावपथ, बॉस्केट बॉल मैदान, व्हॉलिबॉल मैदान, जीम यासारख्या मैदानाचा आराखड्यात समावेश करण्यात यावा. मैदानावर स्पर्धा घेता येईल किंवा सार्वजनिक कार्यक्रम घेण्याकरीता मोठ्या मंचाची उभारणी करण्यात यावी. सोबतच पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, शौचालयाच्या स्वतंत्र व्यवस्थेचा आराखड्यात समावेश करण्यात यावा. संपूर्ण विद्युत व्यवस्था सोलर कार्यान्वित करण्यासाठी प्रेक्षक गॅलरीवर सोलर पॅनलची उभारणी होईल, अशा नियोजनाचा आराखडा तयार करण्यात यावा, असे पालकमंत्री भोयर यांनी सांगितले.
यावेळी आर्किटेक्चरने तयार केलेल्या आराखड्याची पावर पॅाईंट प्रेजेंटेशनद्वारे पाहणी करुन यामध्ये काही बाबी सुचविण्यात आल्या. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी १० कोटी रुपये अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नगर परिषदेच्या नवीन जलतरण तलावाची पाहणी
नगर परिषदेच्यावतीने महिला व बालकांसाठी ५ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या व सद्या प्रगतीपथावर असलेल्या जलतरण तलावाची पाहणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, मुख्याधिकारी विजय देशमुख, नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते.
यावेळी डॉ.पंकज भोयर यांनी प्रगतीपथावर असलेल्या जलतरण तलावाची पाहणी करुन लवकरात लवकर कामे पुर्ण करावे, अशा सुचना देऊन पार्किगची व्यवस्था तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जलतरण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असून गॅलरीमध्ये वाढ करावी. यासाठी आणखी निधीची आवश्यकता असल्यास मंजूर करण्यात येईल. खुल्या जागेवर स्पोर्ट कॉम्प्लेक्स बांधण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
News - Wardha




Petrol Price




