महत्वाच्या बातम्या

 झंकारगोंडी फाट्यावर आजपासून सर्वपक्षीय बेमुदत चक्काजाम आंदोलनला सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच महाराष्ट्राच्या सुद्धा शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगत असलेला आदिवासीबहुल नक्षलग्रस्त तालुका म्हणजे येथील मागील तीन वर्षापासून कोरची तालुक्यात विजेची समस्या तालुक्यातील जनतेसाठी डोकेदुखी ठरत असल्यामुळे या समस्येच्या निराकरणासाठी तालुक्यातील सर्व पक्ष हे एकजुटीने झंकारगोंदी फाट्यावर आज पासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कोरची तालुका डोंगराळ भागात वसलेला असून या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथून आणि गोंदिया जिल्ह्यातील चिचगड येथून विद्युत पुरवठा केला जातो. कोरची ते कुरखेडा दरम्यान २० किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आहे. त्याचप्रमाणे कोरची ते चिचगड दरम्यान २२ किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आहे. त्यामुळे कोरचीला कुरखेडा आणि चिचगड वरून येणारा विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असतो म्हणून दोन्ही बाजूने येणारी वीज जोडणी एरियल बंच केबल द्वारे करण्यात कारण व तोपर्यंत कोरचीला २३ केवी वीज पुरवठा चिचगड वरून नियमित सुरू ठेवण्यात यावे. कोरची तालुक्यातील एकूण गावांची संख्या १३३ असून कोरची येथे फक्त ३३ केव्ही चे सबस्टेशन आहे. सध्या कुरखेडा वरून कोरची साठी फक्त 24 केव्ही विद्युत पुरवठा केला जातो. त्यामुळे कमी दाब होत असल्याने कोणतेही जड उपकरणे चालत नाही व ते निकामी होत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून कुरखेडा येथे १३२ केव्ही च्या मुख्य स्टेशनची निर्मिती करून कोरची ला ६६ केव्ही च्या सबस्टेशनची निर्मिती करण्यात यावी कारण कोरची वरूनच नवनिर्मित ढोलडोंगरी सब स्टेशनला ३३ केवी वीज पुरवठा होणार आहे. कोरची येथील सब स्टेशन मध्ये ३० वर्षापेक्षा जास्त कालावधीची जुनी उपकरणे असल्यामुळे सुद्धा विद्युत पुरवठा करण्यास अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे नवीन उपकरणे लावून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावे. तसेच कोरची हे तालुक्याचे ठिकाण असून सर्व शासकीय कार्यालय व ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे कोरची फिडर हा वेगळा करण्यात यावे. मागील चार-पाच वर्षापासून कोरची तालुक्यात कृषी पंपाची संख्या वाढत असून कृषी पंपांना पाहिजे त्या दाबाचा विद्युत पुरवठा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंप चालवणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे कृषी पंपाचे फिडर सुद्धा वेगळे करण्यात यावे. अशा विविध मागणीसह तहसीलदार सोमनाथ माळी यांना निवेदन देण्यात आले होते. आणि आज पासून चक्काजाम आंदोलनास सुरवात करण्यात आले आहे.हे आंदोलन झंकारगोंदी फाट्यावर कोरची तालुका सर्व पक्षीय पदाधिकारी व गावकरी लोकांचे राज्य महामार्गवर विजेची समस्या सूटत नसल्याने बेमूदत चक्का जाम आंदोलन सकाळी १० वाजता पासून सुरू झालेला आहें.


यावेळी कोरची तहसीलदार सोमनाथ माळी व कोरची विद्युत विभागाचे अधिकारी सुमित  वांढरे यांनी आंदोलन स्थळी भेट दिले आणि आंदोलन मागे घेण्यासाठी सांगितले परंतु लिखित दिल्याशियाय समस्या सुटणार नाही असे आंदोलन कर्त्यानी सांगितले आहे. रस्त्यावरून ट्रक व वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक ठप्प झाले आहे. परंतु 108 व इमर्जन्सी सेवा वाहनांना सोडले जात आहे यावेळी पोलिसांचे चोख बंदोबस्त आहे





  Print






News - Gadchiroli




Related Photos