सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध योजनांची जनजागृती व मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्यामार्फत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये युवक-युवतींसाठी रोजगार, कौशल्य विकास, व उद्योजकतेशी संबंधित विविध शासकीय योजना व उपक्रमांची जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२६ रोजी गुरुदेव चिंतामण बिसने कन्या विद्यालय, सरस्वती महीला कला व विज्ञान महाविद्यालय, स्व़. तुळशीरामजी तितीरमारे खाजगी औद्योगीक प्रशिक्षण संस्था मोहाडी तसेच अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी वरठी. येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास कार्यालयाच्या वतीने चेतन बागडे लिपिक टंकलेखक जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा.यांनी भेट देऊन उपस्थित विद्यार्थी व युवकांना विविध शासकीय योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी सेवायोजन कार्ड वेबपोर्टलवर नाव नोंदणी व नोकरीसाठी सहकार्य, रोजगार मेळावे, अल्प मुदतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सेवा-सोसायटी नोंदणी, करिअर ग्रंथालय सदृश अभ्यासिका, उद्योजकता विषयक नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच इनक्युबेशन सेंटर याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार, कौशल्य विकास, प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगाराच्या संधींचा उपयोग करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सदर कार्यक्रमांचे आयोजन मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. गुरुदेव चिंतामण बिसने कन्या विद्यालय,येथे एकुण ४० विद्यार्थी/विद्यार्थिनी, सरस्वती महीला कला व विज्ञान महाविद्यालय येथे एकुण ३०, विद्यार्थी/विद्यार्थिनी, स्व़. तुळशीरामजी तितीरमारे खाजगी औद्योगीक प्रशिक्षण संस्था येथे एकुण ४०, विद्यार्थी/विद्यार्थिनी तसेच अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी वरठी येथे एकूण ८० विद्यार्थी/विद्यार्थिनी, उपस्थित होते.
अशा प्रकारे चार कार्यक्रमांना एकूण १९० विद्यार्थी/विद्यार्थिनींची उपस्थिती होती. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये कौशल्य विकास, रोजगार, प्रशिक्षण व उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.




Petrol Price




