जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समितीवर, विभागीय समन्वयकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : विभागीय आयुक्त (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये एका विभागीय समन्वयकाची नेमणूक करावयाची आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन या क्षेत्रात काम करणाऱ्या व किमान पाच वर्ष अनुभव असलेल्या इच्छुक व्यक्तीनी १५ नोव्हेंबरपर्यत प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय. टी. आय. समोर, श्रध्दानंदपेठ, नागपूर - ४४००२२ या पत्त्यावर अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले.
News - Nagpur