नायलॉन मांजाने गळा कापल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
- मकरसंक्रांतीच्या दिवशीच काळाचा घाला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नायलॉन मांजाने गळा कापल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. वेद साहू असे ११ वर्षीय मुलाचे नाव आहे.
वेद शनिवारी सायंकाळी त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवर जात होता. अचानक मांजा आला व त्याचा गळा कापला गेला. त्यात तो जखमी झाला. त्याला मानकापूर येथील इस्पितळात नेण्यात आले, मात्र तेथे उपचार झालेच नाही. अखेर रात्री धंतोलीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. जखम गंभीर होती व उपचार मिळायला उशीर झाला.
अखेर मकरसंक्रांतीच्या सकाळीच त्याचा मृत्यू झाला. हसतखेळत असलेल्या वेदवर डोळ्यासमोर काळाने घाला घातल्याने पालक व नातेवाईक धक्क्यात आहेत.
News - Nagpur