स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना प्रेरणादायक : खासदार रामदास तडस
- जिल्हा मेळाव्यातील स्काऊटस गाईड्सनी दिला स्वच्छतेचा संदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : स्वच्छतेबाबत जनजागृती करताना लोकांना सहभागी करून घेणे आवश्यक असून या दृष्टिकोनातून जिल्हा मेळाव्यातील स्काऊटस गाईड्स नी राबविलेली स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पना प्रेरणादायक आहे, असे प्रतिपादन स्थानिक आठवडी बाजार परिसरात आयोजित स्वच्छता अभियानाच्या समारोप प्रसंगी ६ जानेवारी रोजी खासदार रामदास तडस यांनी केले.
यावेळी न. प. चे माजी उपाध्यक्ष डाॅ. नरेंद्र मदनकर, रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे, गाईडचे जिल्हा संघटक वैशाली अवथळे, रत्नापुर चे उपसरपंच सौरव कडू, रोव्हर लिडर संतोष तुरक, रोव्हर लिडर प्रा. रविंद्र गुजरकर, राजहंस जंगले, सुरेन्द्र उमाटे, दिपक गुढेकर, अभिजित पारगावकर, निर्मला नंदुरकर, उर्मिला चौधरी, भारती तायडे, संगीता पेठे, अमोल मानकर, याकुब शेख, रूपा कडू, वसुंधरा वडतकर, संकेत हिवंज, आसीफ शेख व योगेश आदमने उपस्थित होते.
News - Wardha