महत्वाच्या बातम्या

 कोरची पोलिसांचा मोहादारूवर छापा : युवक जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / कोरची : तालुक्यातील टेकाबेदड गावशिवारात हातभट्टीची मोहादारू साठवून चिल्लर विक्री करणाऱ्या युवकावर कोरची पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास नाल्याच्या किनाऱ्यावरील शेतात टाकलेल्या धाडीत करण्यात आली, जिथून एकूण १५ लिटर मोहादारू जप्त करण्यात आली.

महिला पोलिस हवालदार वनिताच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मोहादारूचे नमुने परीक्षणासाठी राखून उर्वरित दारू घटनास्थळीच नष्ट केली. पोलिस सहकाऱ्यांसह पेट्रोलिंगवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित शेतात पंचांसह छापा टाकण्यात आला.

या छाप्यामध्ये स्वप्नील दशरथ मेश्राम (२८, रा. टेकाबेदड) हा संशयित आढळून आला. झडतीदरम्यान प्रत्येकी ५ लिटर क्षमतेच्या तीन कॅनमध्ये हातभट्टीची मोहादारू आढळली. चौकशीत आरोपीने कबुली दिली की ही दारू तो प्रति पाव ५० रुपयांनी विक्री करत होता, आणि एकूण तीन हजार रुपयांची होती.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध कारवाई करून पुढील तपास सुरू केला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos