गडचिरोली जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधितांची नोंद नाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 240 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या तसेच कोरोनामुक्ताची संख्या निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38278 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37483 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 16 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 779 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.92 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.04 टक्के तर मृत्यू दर 2.04 टक्के झाला आहे.
News - Gadchiroli