महत्वाच्या बातम्या

 एमजेएफ महाविद्यालयाच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या खेळाडूंनी तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे झालेल्या आंतरशालेय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मजल मारली.

१९ वर्षांखालील मैदानी स्पर्धेत ओंकार तलांडे याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. धीरज कुकडकर याने ८०० मीटर तसेच १५०० मीटर धावण्याच्या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. भाविक बुरे याने ८०० मीटर व १५०० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. श्रावणी पेंदाम हिने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, तर समीर मानकर याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेचा मार्ग निश्चित केला आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय कायरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल, क्रीडा संचालक प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिवाकर मोहितकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






Related Photos