महत्वाच्या बातम्या

  नागपुरात डाक अदालतचे आयोजन ३० सप्टेंबरपर्यंत तक्रारी पाठवण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : टपाल विभागाच्या सेवेबाबत नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी येथील अधीक्षक, आरएमएस एफ विभाग, यांच्या कार्यालयात १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

टपाल सेवेतील कामकाजाबाबत तीन आठवड्यांत ज्या तक्रारींचे निवारण झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल. यात प्रामुख्याने टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल यासंबंधीच्या तक्रारींचा समावेश असेल.

नागरिकांनी आपल्या तक्रारीत मूळ तक्रार पाठवल्याची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा यासह संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. ही तक्रार दोन प्रतींमध्ये बी. अंभोरे, अधीक्षक, आरएमएस एफ विभाग, पहिला मजला, जीपीओ परिसर, नागपूर - ४४०००१ या पत्त्यावर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. मुदतीनंतर येणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे डाक विभागाकडून  कळवण्यात आले आहे.





  Print






Related Photos