ओबीसींच्या हक्काच्या जनगणनेसाठी दिल्लीच्या आंदोलनाची तयारी : २० सप्टेंबरला हैदराबादेत निर्णायक बैठक


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : २०२७ च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश व्हावा, या मागणीने आता जोर धरला असून, या मागणीसाठी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान होणाऱ्या ठिय्या आंदोलनाच्या नियोजनाला वेग आला आहे. आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ रोजी हैदराबाद येथे ओबीसींची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बेगमपेठ येथील हॉटेल टुरिझम प्लाझा येथे सकाळी १० वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे. भारत सरकारच्या जनगणना प्रश्नावलीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची तरतूद नसल्याने २०२७ च्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्याची मागणी या बैठकीत प्रमुख्याने मांडली जाणार आहे.
दिल्लीतील प्रस्तावित ठिय्या आंदोलनाचे नियोजन, आंदोलनाची रूपरेषा आणि ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी आंदोलनाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाजुला श्रीनिवास गौड तसेच खासदार आणि आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बीसी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, विविध ओबीसी संघटनांचे अध्यक्ष तसेच सर्व जात संघटनांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
ओबीसी समाजाच्या जनगणनेतील स्वतंत्र नोंदीच्या मागणीला संघटित स्वरूप देण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले आहे.




Petrol Price




