महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जिल्हास्तरीय गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकीचे आयोजन 


- पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिका­यांसह जिल्हा भरातील ५०० हून अधिक गणपती मंडळ प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व पोलीस पाटील यांचा सहभाग

- गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवून उपद्रवी व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्रात गणेशोत्सव शांततेत, उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आज ०३ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशोत्सव मंडळ संवाद बैठकीचे आयोजन संस्कृती सभागृह, गडचिरोली येथे करण्यात आले.

या संवाद बैठकीस जिल्ह्रातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सुरक्षा उपाययोजना, वाहतूक व्यवस्था, मिरवणुकीचे नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर, विद्युत सुरक्षाव्यवस्था, महिला व बालकांची सुरक्षितता तसेच सामाजिक सलोखा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यासोबतच जिल्ह्रातील सर्व गणेश मंडळांनी आपल्या गणेश मंडळांची ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच गणेशोत्सव काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणा­या अफवा, आक्षेपार्ह संदेश किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणा­या पोस्टबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. अशा प्रकारची माहिती आढळून आल्यास ती पुढे प्रसारित न करता तत्काळ गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आणून द्यावी, याबाबत सूचना देण्यात आल्या. 

यासोबतच उपस्थितांकडून त्यांच्या संबंधित अडचणी जाणून घेतल्या. तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांच्या सहकार्याने प्रभावी सुरक्षा व्यवस्था राबविण्यात येणार असून, गडचिरोली पोलीस दलाकडून संवेदनशील ठिकाणी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये तसेच गणेश विसर्जन मिरवणुका सुरक्षित व सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी गणेश मंडळांनी गडचिरोली पोलीस दलाशी आवश्यक समन्वय ठेवावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले. 

सदर आयोजित बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद संपल्यानंतर प्रथमच मोठा उत्सव साजरा करत असून तो अधिक जल्लोषात व शांततेच्या वातावरणात पार पाडणे ही सर्वाची जबाबदारी आहे. यासोबतच गणेश मंडळांनी शासन व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, मंडप व मिरवणुकीच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकारास अथवा अफवांना थारा देऊ नये, तसेच एक गाव एक गणपती ही योजना संपूर्ण जिल्ह्रात राबविण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी आवाहन करुन गैरकायदेशिर कृत्य व अवैद्ध धंदे करणारे उपद्रवी आणि समाजकंटक यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटीबद्ध राहील असे सांगितले.

यावेळी आयोजित संवाद बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली अनिकेत हिरडे, सहा. पोलीस अधीक्षक, धानोरा सुयश कुमार सिंग, सहा. पोलीस अधीक्षक, भामरागड सागर भामरे, जिविशाचे पोनि. विशाल काळे, स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे, सर्व पोस्टेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच गडचिरोली जिल्ह्रातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






Related Photos