ग्रामसेवकावर कठोर कारवाई करा : आमदार देवराव होळी यांना ग्रामस्थांचे निवेदन
- भ्रष्टाचारामध्ये दोषी असल्याचा अहवाल प्राप्त होऊनही अजून पर्यंत ग्रामरोजगार सेवकावर कारवाई नाही
- जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचीही योग्य प्रकारे अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप
- आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावत नसल्याने ग्रामसेवकावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भाडभिडी येथील ग्राम रोजगार सेवक विलास कुनघाडकर यांनी मनरेगा कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा अहवाल २५ मे २०२२ रोजी प्राप्त झाल्यानंतरही भाडभिडी येथील ग्रामसेवक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याने आपले कर्तव्य योग्य प्रकारे न बजावणाऱ्या या ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी भाडभिडी येथिल ग्रामस्थांनी आमदार देवराव होळी यांना निवेदन देऊन केली आहे.
यावेळी निवेदन देताना भाडभिडी येथिल निरज वैरागडे, उमेश नैताम, वसंत कुनघाडकर, सोमेश्वर मुसद्दीवार, संजय नैताम, वैभव कुनघाडकर, दशरथ कुनघाडकर, वसंत कुनघाडकर, गणपत उरवेटे, रविंद्र कनाके धनराज शेंडे, रविंद्र शेंडे यांच्या सह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
भाडभिडीचे ग्रामसेवक हे ग्रामरोजगार सेवकाला पूर्णपणे अभय देत असून ग्रामसभेने ग्रामरोजगार सेवकाला तात्काळ पदावरून हटविण्याचा ठराव मंजूर केलेला असतानाही व चौकशीच्या अहवालामध्ये हा रोजगार सेवक दोषी आढळूनही त्यांना अजून पर्यंत कामावरून का काढले नाही. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केवळ याच प्रकरणात नाही. तर जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचीही ग्रामसेवकांने योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केले आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय ग्रामसेवकाला भाडभिडी येथील पदावरून तात्काळ हटवण्यात यावे. अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार देवराव होळी यांच्याकडे केले आहे.
News - Gadchiroli