२८ सप्टेंबर रोजी निवृत्तीवेतन धारकांसाठी महाउपलब्धी प्रशिक्षण कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाच्या सेवानिवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी महाउपलब्धी संदर्भातील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन २८ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी ११ वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत महाउपलब्धी प्रणालीसंदर्भात सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांना या प्रणालीचा वापर, आवश्यक प्रक्रिया आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन -
कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या सर्व राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी काही आवश्यक कागदपत्रे व माहिती सोबत आणावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
यामध्ये ज्या बँक खात्यातून संबंधित निवृत्तीवेतनधारक निवृत्तीवेतन घेतात, त्या बँक खात्याचे पासबुक, ई-केवायसीची माहिती, संबंधित बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसेच पीपीओ (PPO) क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे.
महाउपलब्धी संदर्भातील प्रशिक्षण व प्रक्रिया समजून घेण्यासाठी संबंधित सर्व सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




