महत्वाच्या बातम्या

 यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : स्थानिक तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाअंतर्गत पार पडलेल्या १७ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत येथील यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

क्रीडा संकुल आरमोरी येथे दिनांक २४ सप्टेंबर रोजी या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बप्पी सना व प्रेम रॉय या विद्यार्थ्यांनी दुहेरी बॅडमिंटन प्रकारात, तर चिन्मय इन्कने या विद्यार्थ्याने एकल बॅडमिंटन प्रकारात बाजी मारत जिल्हास्तरावर धडक मारली आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे, सचिव डॉ. सचिन खोब्रागडे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.





  Print






Related Photos