क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती मोट्या उत्साहाने साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड (पेरमिली) : मौजा तलवाडा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती मोट्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमात सर्वप्रथम गावातील मुख्य मार्गातून सप्तरंगी झंडा पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आले व सर्व प्रथम तलवाडा येथील सप्तरंगी झंड्याचे ध्वजारोहन तिरु. रामा बापू सिडाम यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर तलवाडा येथील सल्ला शक्तीचे पंच कलश गोंगो (मुटपूजा ) भूमक तिरु. रवी कुडमेथे रा. राजगोपालपूर, भूमक तिरु. संदेव मडावी रा. धरमपूर यांचे हस्ते करण्यात आले. नंतर मार्गदर्शनाचे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष. तिरु. जी. डी. मडावी ग्रामसेवक मेडपली होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर तिरु. बालाजीदादा गावडे माजी सरपंच येरमनार, तिरु. प्रमोदादा आत्राम माजी सरपंच पेरमिली, तिरु. सांबय्या करपेत कमलापूर, तिरु. कैलाश कोरेत अलापल्ली, तिरु. वासुदेव मडावी (शिक्षक मुलचेरा) तिरु. नारायण सिडाम नेहरू युवा मंचचे समन्व्यक अहेरी, तिरु. पुजा मडावी तलाठी मेडपली तिरु. दिवाकर मडावी नागेपल्ली. तिरु. बाबुराव तलांडे तुमीरकसा, तिरु. लक्ष्मण गावडे पोलीस पाटील वेडमपल्ली हे उपस्थित होते. सदरील कार्यमाचे प्रस्थाविक तिरु. संतोष आत्राम तलवाडा यांनी केले सूत्रसंचालन तिरु. वासुदेव कोडापे पेरमिली यांनी केले व आभार तिरु. मडावी मुख्यध्यापक जि. प. प्रा. शा. तलवाडा यांनी मानले. सदरील कार्यक्रमाचे यशस्वीते करीता तलवाडा येथील तिरु. देवाजी पोदाळी, सुरेश गावडे, सुरेश पोदाळी,संतोष आत्राम, आकाश मडावी, संबा आत्राम, हरिदास सिडाम, व तलवाडा येथील संपूर्ण युवक - युवती अथक परिश्रम घेतले सदरील कार्यक्रमात जवळपासचे गावातील प्रतिष्टीत समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढविले.
News - Gadchiroli