महत्वाच्या बातम्या

 चिमढा शिवारात जुगार अड्ड्यावर मुल पोलिसांची धाड : तिघे रंगेहात अटकेत, चौघे फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चिमढा शिवारातील जंगलात निंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर मुल पोलिसांनी रविवारी १३ सप्टेंबर सायंकाळी धाड टाकून तीन जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह मोपेड आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ७० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत चार जण घटनास्थळावरून फरार झाले.

पोलीस स्टेशन मुल हद्दीतील चिमढा शिवार, फॉरेस्ट वेजवळील झुडपी जंगलात निंबाच्या झाडाखाली जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता अचानक धाड टाकली. यावेळी सौरभ बंडू गिरडकर २४ वर्षे रा. इंदिरानगर वॉर्ड, मुल, बंडू मनोहर मोटघरे ४९ वर्षे रा. ताडाळा रोड, मुल आणि विजय नामदेव पाल ५२ वर्षे रा. फुटाणा, ता. पोंभुर्णा यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी जुगाराच्या पटावरील ७ हजार रुपये, आरोपींच्या अंगझडतीत मिळालेले ३ हजार ५०० रुपये, ५२ पत्त्यांचा कॅट तसेच एमएच ३४ बीडब्ल्यू ३१०७ क्रमांकाची अ‍ॅक्सेस १२५ मोपेड असा एकूण ७० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान दीपक मोतीराम शेंडे २८ वर्षे रा. चिमढा, सौरभ रविकुमार हुलके व श्यामराव टेकचंद डोंगरवार दोघेही रा. ताडाळा रोड, मुल तसेच रवि मोहूर्ले रा. चिंचाळा, ता. मुल हे चौघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मुल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रूपेश कुंभरे, पोहवा पंकज बगडे, बबन वाकडे, पोअं दिलीप आडे आणि प्रमोद सावसाकडे यांनी केले.





  Print






Related Photos