महत्वाच्या बातम्या

 फलोत्पादन अभियानांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विकास या घटकासाठी पाच दिवशीय प्रक्षेत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी ईच्छूक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. सदर प्रक्षेत्र प्रशिक्षणांतर्गत नाशिक विभागातील ज्या ठिकाणी फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम झालेले आहे, त्या ठिकाणी प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी नियोजन करण्यात येणार आहे. फलोत्पादन कृषि क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संस्था जसे शिल्लोड येथील कृषि प्रदर्शनी, जैन इरीगेशन, जळगाव, सह्याद्री फार्म एफपीओ (मोहाडी) नाशिक, आंबाधन लागवड व रोपवाटीका चिंचगाव ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान, कांदा संशोधन केंद्र चितेगाव, जि. नाशिक, कांदा मार्केट, लासलगाव, बाभळेश्वर विज्ञान केंद्र भेट, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अशा संस्थांच्या ठिकाणी प्रक्षेत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी आर्वी, आष्टी व कारंजा या तालुक्यातील फलोत्पादन, भाजीपाला या क्षेत्रात काम करणाऱ्या ७० शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहेत. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणात सहभागी शेतकऱ्यांना प्रति दिन एक हजार रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त पाच दिवसाचा प्रशिक्षण खर्च देय राहील. आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील फलोत्पादन क्षेत्रातील इच्छूक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास ३१ डिसेंबर पुर्वी अर्ज सादर करावे, असे उपविभागीय कृषि अधिकारी, आर्वी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos