विषारी औषध प्राशन केल्याने ४० वर्षीय इसमाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पवनी तालुक्यातील बेलघाटा वॉर्ड येथे विषारी औषध प्राशन केल्याने ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अतुल ईश्वर येनोळकर (४०), रा. बेलघाटा वॉर्ड, पवनी, असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल येनोळकर यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी अतुल येनोळकर यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास पोलिस शिपाई राठोड करीत आहेत. विषारी औषध प्राशन करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.




Petrol Price




