आरएमएसतर्फे ३१ ऑगस्टला पेन्शन अदालती चे आयोजन


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर रेल्वे मेल सर्व्हिस (RMS) नागपूरअंतर्गत येणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या प्रलंबित तक्रारींचे त्वरीत निवारण करण्यासाठी विभागीय स्तरावर पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अधीक्षक, आरएमएस फ विभाग, नागपूर यांच्या कार्यालयात ही अदालत पार पडणार आहे.
आरएमएस फ विभागातील ज्या निवृत्तीवेतनधारकांचे पेन्शनविषयक लाभ मागील ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित आहेत, केवळ अशाच तक्रारींचा विचार केला जाणार आहे. मात्र, निव्वळ कायदेशीर बाबींशी संबंधित प्रकरणे - जसे की वारसा हक्क, काल्पनिक पेन्शन (Notional Pension), TBOP/MACP पदोन्नती, वेतनवाढ निश्चिती (Stepping up of pay) आणि धोरणात्मक बाबींशी संबंधित शिस्तभंगाची प्रकरणे या अदालतीमध्ये ग्राह्य धरली जाणार नाहीत.
यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या तक्रारी वैयक्तिकरीत्या (एकापेक्षा जास्त तक्रारी एकत्र किंवा दुसऱ्याच्या वतीने न देता) दोन प्रतींमध्ये सादर करणे बंधनकारक आहे. अर्जात मूळ तक्रार सादर केल्याची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पदनाम याविषयीचा सविस्तर तपशील नमूद केलेला असावा.




Petrol Price




