महत्वाच्या बातम्या

 राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष व सदस्य उद्या भंडारा जिल्हाच्या दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर, सदस्य आर.डी. शिंदे, व के.आर. मेंढे गुरूवार 13 ऑक्टोंबर रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. हे दुपारी 12 वाजता भंडारा येथे आगमन होणार असून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या सोबत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्ह्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा सभा. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यत राखीव असून दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत जिल्हा परिषद सभागृह येथे मुख्य कार्यक्रारी अधिकारी यांच्यासोबत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतील. दुपारी 4 वाजता मोटारीने गोंदियाकडे प्रयाण करतील.





  Print






News - Bhandara




Related Photos