चंद्रपूर : वाघाला केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्र येणाऱ्या गावा मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला आज जेरबंद करण्यात आले. आज सावली तालुक्यातील व्याहड खुर्द येथील गाव तलावाजवळ वाघ असल्याची माहिती वनविभागाला मिळाली त्यावरून वनविभागाची चमू तसेच शीघ्र कृती दलाची चमू त्या परिसरात पोहचली आणि त्या वाघावर अचूक निशाना साधत त्या वाघाला बेशुध्द केले आणि वाघाला जेरबंद केले.
गेल्या अनेक दिवसांपासून सावली तालुक्यातील व्याहड, केरोडा, वाघोली परिसरात धुमाकुळ घालणारा वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग हे शर्थीचे प्रयत्न करीत होते मात्र आज वाघ जेरबंद झाल्याने वनविभाग ची अधिकारी, कर्मचारी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. वाघाला जेरबंद केल्याने परिसरातील गावकरी आनंदित झाले आहे.
News - Chandrapur