महत्वाच्या बातम्या

 NEET परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांमध्ये निराशा, प्रशासनाने कडक पावले उचलावीत : डॉ. ए. व्ही. एस. शर्मा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : देशभरातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षेच्या रद्द होण्याच्या बातमीनंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. अनेक विद्यार्थी इयत्ता ८ वीपासून डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी तयारी करत असतात. वर्षानुवर्षे त्यांनी कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि विविध स्पर्धात्मक प्रशिक्षण घेतलेले असते.

परीक्षा रद्द होण्यामागील कारण काही समाजकंटकांच्या गैरकृत्यांशी संबंधित असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर थेट परिणाम झाला असून, अनेकांनी केलेल्या मेहनतीचे फळ अचानक न मिळाल्याने ते खचलेले आहेत. यामुळे पालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे आणि भविष्यातील तयारीसाठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत डॉ. ए. व्ही. एस. शर्मा, संचालक बालाजी स्टडी सर्कल आणि एन. एस. पी. सि, यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या अशा प्रकारांना प्रशासनाने गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. संबंधित गैरप्रकारांवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.

त्यांनी पुढे सांगितले की, पुन्हा आयोजित करण्यात येणाऱ्या NEET परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांची मनःपूर्वक शुभेच्छा आहेत. मेहनतीच्या जोरावर यश निश्चित मिळेल, त्यामुळे खचून न जाता नव्या उत्साहाने तयारी सुरू ठेवावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि वैद्यकीय शिक्षणासाठीची तयारी या पार्श्वभूमीवर प्रशासनाची योग्य कारवाई हीच एक मोठी गरज ठरते. आगामी परीक्षेत विद्यार्थ्यांनी मनोबल टिकवून ठेवणे आणि नव्या उत्साहाने तयारी करणे महत्त्वाचे ठरेल.





  Print






News - Gadchiroli




Related Photos