रानखेडा येथे नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्वच्छता पंधरवडा


- जय बजरंग क्रिकेट क्लबच्या युवकांनी राबविले स्वच्छता अभियान

विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
नेहरू युवा केंद्र गडचिरोली (खेळ मंत्रालय एवं भारत सरकार) अंतर्गत गडचिरोली तालुक्यातील रानखेडा येथे आज सोमवार दि. ९ ऑगष्ट २०२१ ला जय बजरंग क्रिकेट क्लबच्या युवकांनी गावामधील परिसर स्वच्छ करून आणि ठिकठिकाणी वापलेला केरकचरा काढून स्वच्छता अभियान राबविला. त्यासोबतच गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. नेहरू युवा केंद्र गडचिरोली च्या वतीने सुरु असलेल्या स्वच्छता पंधरवड्याला जय बजरंग क्रिकेट क्लबच्या युवकांनी मोलाचे सहकार्य केले आहे. सदर कार्यक्रम राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आकाश पि. आंबोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जय बजरंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष दर्शन पानसे, निंबाजी तिवाडे, डोमाजी झाडे, अंकीत थोरात, बाजीराव पानसे, पियुष म्हशाखेत्री, आकाश लेनगुरे, पंकज कुरुडकर, बंटी पानसे, करन माङमवार, दादू पानसे, वैभव तिवाडे आणि हर्षल गेडाम यांनी पार पाडले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2021-08-09
Related Photos