महत्वाच्या बातम्या

 पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सरकारने १ एप्रिल २०२३ पासून पीएफचे पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहे. चार दिवसांपूर्वी मांडलेल्या अर्थसंकल्पात यामध्ये बदल करण्यात आले आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढण्यावर लावण्यात येणाऱ्या करात बदल केला आहे. पॅन लिंक नसल्यास, पैसे काढताना ३० टक्क्यांऐवजी २० टक्के टीडीएस आकारला जाणार आहे. बदललेल्या नियमाचा फायदा अशा पीएफ धारकांना होणार आहे, ज्यांचे पॅन अद्याप अपडेट केलेले नाहीत. जर खातेदाराने ५ वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस भरावा लागतो. ५ वर्षांनंतर कोणताही टीडीएस आकारला जात नाही.

यामुळे याचा फायदा नवीन नोकरी लागणाऱ्यांना होणार आहे. याबरोबर आणखी एक बदल म्हणजे TDS साठी १० हजार रुपयांची किमान थ्रेशोल्ड मर्यादा देखील बजेट २०२३ मध्ये काढून टाकण्यात आली आहे. परंतू, लॉटरी आणि कोडींच्या बाबतीत, १० हजार रुपयांच्या मर्यादेचा नियम लागू राहील. एका आर्थिक वर्षात एकूण १० हजारांपर्यंत टीडीएस कापला जाणार नाही. त्यानंतर टीडीएस कापला जाईल.

ज्या लोकांकडे पॅन कार्ड आहे. त्यांना कमी टीडीएस भरावा लागतो. एखाद्याचे पॅनकार्ड ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केले नसेल तर त्याला ३०% पर्यंत टीडीएस भरावा लागत होता. आता तो २० टक्के झाला आहे. जर ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली जात असेल आणि पॅन कार्ड उपलब्ध असेल तर १० % टीडीएस आकारला जाईल. परंतु जर पॅन नसेल तर त्याला आता ३०% ऐवजी २०% टीडीएस भरावा लागेल.

  Print


News - Rajy
Related Photos