महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे योगिता पिपरे यांचे आवाहन
- गडचिरोलीत उद्या भाजपचा जिल्हा महिला मेळावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने उद्या 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात भव्य जिल्हा महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या, महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या स्त्री शक्ती तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. चित्रा वाघ ह्या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणुन खास. अशोक नेते, आम. डॉ देवराव होळी, आम कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिला संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, प्रशांत वाघरे, गोविंद सारडा, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये तसेच भाजपचे सर्व आघाडी/ मोर्चा चे जिल्हाध्यक्ष, महामंत्री उपस्थित राहणार आहेत.
महिला मेळाव्याला जिल्ह्यातील व गडचिरोली शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन स्त्री शक्ती मा. चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगीता भांडेकर, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री अर्चना ढोरे, भारती इष्ठाम, वर्षाताई शेडमाके, जिल्हा सचिव गीता हिंगे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, वडसाच्या माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, प्रिती शंभरकर, पायल कोडाप, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, वैष्णवी नैताम, लता लाटकर, निता उंदिरवाडे, नीलिमा राऊत, अर्चना निंबोड, पूनम हेमके, भावना हजारे, रश्मी बाणमारे, कोमल बारसागडे तसेच भाजपा जिल्हा व शहर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
News - Gadchiroli