महत्वाच्या बातम्या

 जनावरांच्या लम्पी स्किन रोगाचे वेळीच उपाययोजना करण्याचे कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जनावरांवर येणारे लम्पी स्कीन डिसीज चे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पशुपालकांनी मुळीच घाबरून न जाता लम्पी स्कीन रोगाचे सकारात्मक निदान करण्याकरीता नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचार करून घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली व्दारे करण्यात येत आहे.
लम्पी स्कीन रोग हा त्वचा रोग असून हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. हा आजार माणसांवर होत नाही. हा विषाणू मेंढ्यामध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूशी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकर्मित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा आजार साधारणपणे दोन ते तीन आठवड्यात बरा होणारा आजार असून लम्पी स्कीन आजारापासून जनावरांचे बचाव होण्यासाठी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली व्दारे करण्यात येत आहे.
जनावरांसाठी घातक लम्पी त्वचा रोग
लम्पी स्किन त्वचा रोग असून विषाणूमुळे होणारा साथीचा आजार आहे. याचा प्रादुर्भाव सर्व वयोगटातील गाई, म्हशीमध्ये आढळतो व तो मोठ्या प्रमाणात पसरतो. गाई मध्ये याचे प्रमाण म्हशी पेक्षा जास्त दिसते. प्रौढ जनावरापेक्षा लहान वासरामध्ये याचे प्रमाण जास्त असते. शेळ्या, मेंढ्यामध्ये हा आजार आढळत नाही. या आजारामुळे मरतुकीचे प्रमाण कमी आहे. परंतू जनावर अशक्त होते. जनावराची त्वचा कायम स्वरूपी डागाळलेली खराब होते व बाजारमुल्य कमी होते. दूध उत्पादन घटते व बैलांच्या कार्य क्षमतेवर परिणाम होतो.
लम्पी स्किन आजार सण १९२९ ते १९७८ पर्यंत दक्षिण व पूर्व आफ्रिकेमध्ये दिसून येत होता. सण २००० मध्ये तो मध्य पूर्वेतील देश, त्यानंतर २०१३ मध्ये तुर्की येथे आढळला. अलीकडेच तो रशिया, चायना, बांग्लादेश व आता भारतात पसरताना दिसत आहे. भारतात या रोगाची नोंद ओरिसा राज्यात ऑगष्ट २०१९ रोजी झाली महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये याची लागण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जनावरामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे सदरील रोगाचे शास्त्रशुध्द पध्दतीने व्यवस्थापन आणि लसीकरण राबविणे क्रमप्राप्त झाले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos