महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात विविध विद्यापीठ संघांनी मारली बाजी
विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर ३१ ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (महिला) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी विविध विद्यापीठांच्या संघांनी जोरदार लढा देवून विजय प्राप्त केला. या स्पर्धेत गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र या पाच राज्यातील ७२ विद्यापीठांचे व्हॉलीबॉल महिला संघाचे खेळाडू सहभागी झाले आहेत.
दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या सत्रात पूल अ मध्ये गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद विरुद्ध शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यात झालेल्या सामन्यात कोल्हापूर विद्यापीठ संघ विजयी झाला. बर्कतुल्लाह विद्यापीठ, भोपाळ विरुद्ध महाराजा गंगा सिंह विद्यापीठ, बिकानेर यांच्यात रंगलेल्या सामन्यात बिकानेर विद्यापीठ संघ विजयी झाला. महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर विरुद्ध पी.डी.यु.एस. विद्यापीठ, सिकर यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये सिकर विद्यापीठ संघाने विजय मिळविला.
पूल ब मध्ये राजस्थान विद्यापीठ, जयपूर विरुद्ध वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत यांच्यात झालेल्या सामन्यात जयपूर विद्यापीठ संघ विजयी ठरला. भारती विद्यापीठ, पुणे विरुद्ध भक्त कवी नरसिंह मेहता विद्यापीठ, जुनागढ यांच्यात रंगलेल्या सामन्यात जुनागढ विद्यापीठ संघाने विजय प्राप्त केला. खुशाल दास विद्यापीठ, हनुमानगढ विरुद्ध देवी अहिल्या विद्यापीठ, इंदौर यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये हनुमानगढ विद्यापीठ संघाने बाजी मारली. हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठ, पाटण विरुद्ध गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद यांच्यात झालेल्या सामन्यात पाटण विद्यापीठ संघाने विजय मिळविला. राजस्थान विद्यापीठ, जयपूर विरुद्ध भक्त कवी नरसिंह मेहता विद्यापीठ, जुनागढ यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये जुनागढ विद्यापीठ संघ विजयी ठरला.
पूल क मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती विरुद्ध मारवाडी विद्यापीठ, राजकोट यांच्यात झालेल्या सामन्यात अमरावती विद्यापीठाने बाजी मारली. एच.एस.एन.सी. विद्यापीठ, मुंबई विरुद्ध राजीव गांधी प्रौद्योगिकी विद्यापीठ, भोपाळ यांच्यात रंगलेल्या सामन्यात भोपाळ विद्यापीठ संघाने विजय मिळविला. गुजरात टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, अहमदाबाद विरुद्ध गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ संघाने बाजी मारली. विक्रम विद्यापीठ, उज्जैन विरुद्ध सोमैया विद्याविहार विद्यापीठ, मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात उज्जैन विद्यापीठ संघ विजयी ठरला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती विरुद्ध राजीव गांधी प्रौद्योगिकी विद्यापीठ, भोपाळ यांच्यात रंगलेल्या सामन्यात अमरावती विद्यापीठ संघाने विजय मिळविला.
पूल ड मध्ये केंद्रीय विद्यापीठ राजस्थान, अजमेर विरुद्ध जिवाजी विद्यापीठ, ग्वालियर यांच्यात झालेल्या सामन्यात ग्वालियर विद्यापीठ संघाने विजय मिळविला. महाराजा छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ, छत्तरपूर विरुद्ध जयनारायण व्यास विद्यापीठ, जोधपूर यांच्यात रंगलेल्या सामन्यात जोधपूर विद्यापीठ संघ विजयी ठरला. पारुल विद्यापीठ, वडोदरा विरुद्ध गोविंद गुरु विद्यापीठ, गोधरा यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये गोधरा विद्यापीठ संघाने विजय मिळविला.
पहिल्या दिवशीचे दुसरे सत्र
पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात पूल अ मध्ये मोहनलाल सुखदिया विद्यापीठ, उदयपूर विरुद्ध पी.डी.यु.एस. विद्यापीठ, सिकर यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये सिकर विद्यापीठ संघाने विजय मिळविला. महाराजा गंगा सिंह विद्यापीठ, बिकानेर विरुद्ध के. बी. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांच्यात रंगलेल्या सामन्यात बिकानेर विद्यापीठ संघ विजयी ठरला. राणी दुर्गावती विद्यालय, जबलपूर विरुद्ध सरदार पटेल विद्यापीठ, गुजरात यांच्यात झालेल्या सामन्यात जबलपूर विद्यापीठ संघ विजयी ठरला. वनिता विराम महिला विद्यापीठ, सुरत विरुद्ध वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्यात रंगलेल्या सामन्यात परभणी विद्यापीठ संघाने विजय मिळविला.
पूल ब मध्ये देवी अहिल्या विद्यापीठ, इंदौर विरुद्ध हरिसिंह गौर विद्यालय, सागर यांच्यात झालेल्या सामन्यात इंदौर विद्यापीठ संघाने बाजी मारली. भक्त कवी नरसिंह मेहता विद्यापीठ, जुनागढ विरुद्ध महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी सामन्यामध्ये राहुरी विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे जुनागढ विद्यापीठ संघाला विजयी घोषित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विरुद्ध गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये अहमदाबाद विद्यापीठ संघ विजेता ठरला. हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठ, पाटण विरुद्ध इंदिरा गांधी नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटी, अमरकंटक सामन्यामध्ये अमरकंटक विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे पाटण विद्यापीठ संघ विजयी घोषित करण्यात आला.
पूल क मध्ये बन्स्थाली विद्यापीठ, राजस्थान विरुद्ध गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्यात झालेल्या सामन्यात गडचिरोली विद्यापीठ संघाने विजय मिळविला. राजीव गांधी प्रौद्योगिकी विद्यालय, भोपाळ विरुद्ध एम.आय.टी. वल्र्ड पीस विद्यापीठ, पुणे सामन्यात पुणे विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे भोपाळ संघाला विजयी घोषित करण्यात आले. विक्रम विद्यापीठ, उज्जैन विरुद्ध आय.आय.एस. विद्यापीठ, जयपूर यांच्यात रंगलेल्या सामन्यात उज्जैन विद्यापीठ संघ विजयी झाला. सोमैया विद्याविहार विद्यापीठ, मुंबई विरुद्ध सिम्बोसिस इंटरनॅशनल (डिम्ड युनिव्हर्सिटी) पुणे सामन्यात पुणे विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे मुंबई विद्यापीठ संघ विजयी घोषित करण्यात आला.
पूल ड मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर विरुद्ध एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांच्यात सामना रंगला, त्यामध्ये मुंबई विद्यापीठ संघ विजयी घोषित झाला. महाराजा छत्रसाल बुंदेलखेड विद्यापीठ, छत्तरपूर विरुद्ध महाराजा सुरजमल ब्रिज विद्यापीठ, भरतपूर सामन्यामध्ये भरतपूर विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे छत्तरपूर विद्यापीठ संघाला विजयी घोषित करण्यात आले. पारुल विद्यापीठ, वडोदरा विरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यात झालेल्या सामन्यात वडोदरा विद्यापीठ संघाने विजय प्राप्त केला. गोविंद गुरु विद्यापीठ, गोधरा विरुद्ध वैष्णव विद्यापीठ, इंदौर सामन्यामध्ये इंदौर विद्यापीठ संघ अनुपस्थित राहिल्यामुळे गोधरा विद्यापीठ संघ विजयी घोषित करण्यात आला.
News - Rajy