महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोघे अटकेत, मुख्य आरोपी फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील राजीव गांधी नगर परिसरात छापा टाकून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

या प्रकरणी सिद्धांत माधव गोंडाने (३२) व मोहम्मद अखिल शकील शेख (४५), दोन्ही रा. इंदिरानगर, चंद्रपूर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य आरोपी वासिम झिमरी (वय ४०), रा. घुतकाळा वॉर्ड, चंद्रपूर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी होला हुका शिशा कंपनीचे १४० नग २०० ग्रॅम वजनाचे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, किंमत ३७ हजार १०० रुपये, ईगल हक्काशी कंपनीचे ७२ नग २०० ग्रॅम वजनाचे तंबाखू, किंमत २९ हजार ८८० रुपये तसेच ३३ किलो सुगंधी तंबाखू, किंमत ३८ हजार ४७५ रुपये असा एकूण १ लाख ३५ हजार ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोउपनि सुनिल गौरकार, विनोद भुरले, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं किशोर वाकाटे, पोअं शशांक बदामवार यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos