मेरा युवा भारत, भंडारा यांच्या वतीने सेवा पंधरवाडा उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : मेरा युवा भारत, भंडारा, व माऊली ग्रुप मांडवी यांच्या वतीने सेवा पंधरवाडा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
त्यामध्ये करडी ते भिलेवाडा या मुख्य मार्गावर खमारी जवळ रस्त्याच्या मधोमद एक मोठा धोकादायक खड्डा पडला होता त्यामुळे मार्गावरून सामान्य नागरिकांना प्रवास करतांनी मोठा अपघात होऊ शकला असता त्यामुळे मेरा युवा भारत, भंडारा, व माऊली ग्रुप मांडवी यांच्या वतीने श्रमदान करून खड्डा बुजवण्यात आला. मेरा युवा भारत, भंडारा यांच्या उपक्रमाचे औचित्य साधून या तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला.
सिमेंट, गिट्टी आणि मातीचा वापर करून रस्त्यावरील खड्डा व्यवस्थित बुजवण्यात आला, ज्यामुळे संभाव्य अपघात टळण्यास मदत होणार आहे. या श्रमदान कार्यात सूर्यकांत मरघडे, मयूर बेदरकर, निलेश कुथे, नासिक पडोळे, अंतारामजी भुते, यशवंत बेदरकर, भास्करजी बेदरकर, नामदेव देशमुख, धीरज बेदरकर, बंटी कुथे आणि पृथ्वीराज अहिर यांनी स्वतः उपस्थित राहून मोलाचे योगदान दिले.




Petrol Price




