महत्वाच्या बातम्या

 रोजच्या वापरातील ४८ औषधे गुणवत्ता चाचणीत फेल : केंद्र सरकारकडून यादी जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : धकाधकीचे जीवन आणि बदलची जीवनशैली यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. ब्लड प्रेशरपासून ते निद्रानाशापर्यंत अनेक विकार जडतात. यावर उपाय म्हणून विविध मल्टिव्हिटॅमिन, अँटीबायोटिक्ससारखी औषधे घेतो. प्रत्येकाच्या बॅगेत एखाद्या तरी आजारावरील गोळी असतेच. मात्र याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली असून रोजच्या वापरातील तब्बल ४८ औषधे गुणवत्ता चाचणीत फेल झाली आहे. केंद्र सरकारने याची यादीही जाहीर केली आहे.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन अर्थात सीडीएससीओने (सीडीएससीओ) याबाबत ही धक्कादायक माहिती दिली आहे. रोजच्या वापरातील ४८ औषधे गुणवत्ता चाचणीमध्ये फेल झाल्याचे सीडीएससीओ आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. यात अँटिबायोटिक्स, मल्टीव्हिटॅमिन्स ते रक्तादाबावर घेतली जाणारी वेगवेगळी औषधांचा समावेश आहे. ड्रग सेफ्टी अलर्टमध्ये कॅल्शियम, फॉलिक अ‍ॅसिड, मल्टीव्हिटॅमिन्स, अँटीबायोटिक्स, अँटी-डायबेटिक आणि कार्डिओव्हस्कुलर यासह अनेक नियमित वापरल्या जाणार्‍या औषधांचा दर्जा उत्तम नसल्याचे आणि ही औषधे चाचणीत फेल ठरल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन अर्थात सीडीएससीओने (सीडीएससीओ) दर महिन्याला एक यादी जाहीर करते. सीडीएससीओ ने मार्च महिन्यात १४९७ औषधांचे नमुने तपासले. त्यापैकी ४८ औषधे गुणवत्ता चाचणीत फेल झाली. सरकारने जारी केलेल्या यादीत औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा सौंदर्यप्रसाधने समाविष्ट आहेत जी एकतर मानक दर्जाची नाहीत किंवा बनावट, भेसळयुक्त किंवा चुकीच्या ब्रँडेड आहेत. त्यामुळे फ्लॅग्ड प्रोडक्ट्सही मानक दर्जाची किंवा एनएसक्यू नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कोणती आहेत ही औषधे?
एपिलेप्सी ड्रग गॅबापेंटिन, उच्च रक्तदाबावरील औषध टेल्मिसर्टन, मधुमेहावरील औषध कॉम्बिनेशन ग्लिमेपिराइड, मेटफॉर्मिन आणि एचआयव्हीवरील रिटॉनवीर यांसारख्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या औषधांचा यात समावेश आहे. उच्च रक्तदाब असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात घेत असलेल्या टेल्मा, टेल्मिसर्टन आणि अ‍ॅम्लोडिपाईन या औषधांचाही यात समावेश आहे. या औषधांमध्ये लायकोपेने मिनरल सिरप सारखी औषधेदेखील आहेत. तसेच इतर नियमित घेतल्या जाणार्‍या औषधांमध्ये लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, प्रोबायोटिक्स आणि अनेक मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांच्याही समावेश होतो. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी १२, फॉलिक अ‍ॅसिड आणि नियासीनामाइड इंजेक्शन्सचाही समावेश आहे.





  Print






News - Rajy




Related Photos