तरुणांमध्ये संस्कार व गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे : माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
- आलदंडी येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
- राजे बंधूंचा गावकऱ्यांनी केले जल्लोषात स्वागत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : देशाची भावी पिढी अर्थात आजचे तरुण ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व त्या त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणारे बनले पाहिजेत. यासाठी त्यांच्यामध्ये संस्कार गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री रुजविणे गरजेचे आहे, असे मत माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले. ते आलदंडी येथे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी सहउद्घाटक म्हणून युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम तर प्रमुख पाहुणे प्रशांत ढोंगे, कारे आत्राम गाव पाटील, मासू गावडे, पेडू गावडे, शंकर कुंभारे, सुनील कांबडे, संजय सडमेक, रागेंद्र इष्टाम ग्रा.पं. सदस्य पेरिमिली, सुधाकर दुर्गे ग्रा.पं. सदस्य पेरिमिली, महेश मडावी, राजेंद्र मडावी, तिरुपती कोसरे, सुरज मलिक, महेश हजारे, उमेश चांदेकर, सचिन सिद्धमशेट्टीवार, पंकज एगलोपवार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना युवक हे देशाचे आधारस्तंभ असून युवक सुदृढ राहण्यासाठी आरोग्य हे फार महत्वाचे आहे. त्यासाठी दैनंदिन व्यायाम आणि विविध खेळ खेळणे महत्त्वाचे आहे. पूर्वी तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जायचे. तिथे ग्रामीण भागातील मोजके खेळाडूंना संधी मिळायची. मात्र, आता प्रत्येक खेड्यापाड्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे प्रत्येक गरीब तरुणांना देखील आपल्या मधील क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. आलदंडी सारख्या दुर्गम भागात भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी येथील युवकांनी पुढाकार घेतला. असाच प्रत्येक गावातील तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी वाटेल ती मदत देण्यासाठी तत्पर असल्याचे देखील त्यांनी ग्वाही दिली.
दरम्यान पाहुण्यांचा गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी मंडळाचे सदस्य, परिसरातील नागरिक व कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli