महत्वाच्या बातम्या

 वनराई बंधारा बांधण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे श्रमदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील मौजे कळमगव्हाण येथे कृषी विभाग व गट ग्रामपंचायत कळमगव्हाण - तुळाणा यांचे पुढाकारातून लोकसहभाग व श्रमदानातून कोराडी नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला, यात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी देखील श्रमदान केले.

याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, तहसीलदार रोशन मकवाने, नायब तहसीलदार मधुकर काळे, तालुका कृषी अधिकारी गजानन भोयर, सरपंच मनिषा ढेंगळे, ग्रामपंचायत सदस्य राजीव आसेकर, समर्थ बोढे, पोलीस पाटील देवराव महाकुलकर, बंडू ढेंगळे, दीपक ताणले, ईश्वर आत्राम, रामभाऊ मेले, नितेश महाकुलकर, विजय मिलमिले, विजय बावणे, विजय देहारकर, नितीन बोढे व इतर ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले.

  Print


News - Chandrapur
Related Photos