पेंशन अदालतचे ८ ऑक्टोबर रोजी आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हा कोषागार कार्यालय, भंडारा आणि प्रधान महालेखाकार कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पेंशन अदालतचे आयोजन गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सामाजिक न्याय भवन, सिव्हिल लाईन, भंडारा येथे करण्यात आले आहे.
पेंशन अदालतचे प्रथम सत्र सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, या सत्रात जिल्हा कोषागार कार्यालय, भंडारा अंतर्गत येणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.
द्वितीय सत्र दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत होणार असून, या सत्रात सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनासंबंधी असलेल्या शंका व अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे.
तरी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी, निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी निर्धारित वेळेत सामाजिक न्याय भवन, सिव्हिल लाईन, भंडारा येथे उपस्थित राहून पेंशन अदालतचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालय, भंडारा यांच्यावतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




