यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांची प्रतापगडाला भेट


- यात्रेकरूंना त्रास होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महाशिवरात्री गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध प्रतापगड येथे साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रतापगडाला भेट देत अनेक महत्वाच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केले. दरवर्षी हजारो भाविक यात्रेत सहभागी होतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना देखील प्रशासनासोबत एकत्र येऊन यात्रा सफल करण्याचे आवाहन देखील माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
दरम्यान यात्रेनिमित्त दुकान लावणाऱ्या दुकानदारांच्या समस्या देखील त्यांनी ऐकून घेतले. प्रतापगड यात्रेला येणाऱ्या रस्त्याची सुधारणा तसेच प्रतापगडच्या पायथ्याशी दुकान लावणाऱ्या दुकानदारांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना राजकुमार बडोले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान स्थानिक सरपंच भोजराज लोकडे यांनी विविध समस्यांवर माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे लक्ष वेधले.
News - Gondia