माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते शिवस्वामी महापळी पूजा व १२ ज्योतिर्लिंग रुद्राभिषेक संपन्न
- आलापल्ली येथे शिवभक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील शिव दत्त मंदिर आलापल्ली येथे शिवस्वामी महापळी पूजा व १२ ज्योतिर्लिंग रुद्राभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी तेलंगणा राज्यातील प्रख्यात पंडित नागराज गुरुस्वामी यांच्या उपस्थितीत अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते मोठ्या भक्त- भावाने विधिवत शिवस्वामी महापळी पूजा व १२ ज्योतिर्लिंग रुद्राभिषेक करण्यात आला.
यावेळी मांचिराल (तेलंगणा) येथील शिवस्वामी भजन मंडळी यांच्या शिवभक्ती भजनांनी संपुर्ण वातावरण भक्तिमय झाला. यावेळी भव्य महाप्रसादाच आयोजन मंदिर कमिटी तर्फे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी श्रीनिवास बिट्टीवार(गुरुस्वामी) तसेच रवी रासपुडी, संदीप झाडे, धनंजय कविराजवार, तिरूपती बोमानवार, आदित्य कविराजवार, ऋषी रसपुडीवार, सुरेश रमगिरीवार, समर्थ मलेलवार, लक्ष्मण नोडूवार हे (कान्यस्वामी) तर या कार्यक्रमाचे आयोजन श्रीनिवास नामनवार यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
News - Gadchiroli