नेताजी गहाणे यांची सिंदेवाही तालुका शिवसेना प्रमुख पदी निवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : तालुक्यातील रत्नापूर येथील रहीवासी नेताजी प्रकाश गहाणे यांची बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट) या पक्षासाठी सिंदेवाही तालुका प्रमुख म्हणून निवड झालेली आहे.
सदर निवड राज्यांचे मुख्यमंत्री व पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांचे आदेशानुसार पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव व चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी केलेली असुन सदर निवडीचे पत्र नेताजी गहाणे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. नेताजी गहाणे यांचे निवडीमुळे सिंदेवाही तालुक्यात बाळासाहेबाची शिवसेना यांना निश्चीतच बळकटी मिळुन पक्ष वाढीसाठी मदत होईल.अशी अपेक्षा कार्यकत्यात असुन त्यांचे निवडीने कार्यकत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
News - Chandrapur