मोदींच्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे : आ.डॉ. देवराव होळी
- फराडा- विक्रमपूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या बैठकित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन
- आ.डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत फराडा- विक्रमपूर जि. सर्कल बैठक संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न बघितले असून त्या दृष्टीने त्यांनी देशाची वाटचाल विकसीत भारताकडे सूरू केली आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ.डॉ. देवराव होळी यांनी फराडा- विक्रमपूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या बैठकीच्या प्रसंगी केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, उपसरपंच उमाकांत जुनघरे, प्रतिमा सरकार, माजी पं. स. सदस्य विष्णू ढाली, सेवक पा. आभारे, रामचंद्र वरवाडे यांच्या सह भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli