शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले अभिवादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / मूलचेरा : तालुक्यातील अंबाटपली येथील वीर बाबूराव शेडमाके यांना अभिवादन करण्यात आले. अंबाटपल्ली येथील सल्ला गांगरां शक्ती स्थापना सप्तरंगी ध्वजारोहण सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम व सामाजिक संस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे.
आयोजित कार्यक्रमाला आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमाचा उदघाटन करून वीर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच सदर कार्यक्रमाला त्यांनी आपल्यापरीने आर्थिक मदत केली. त्यावेळी कार्यक्रम दरम्यान माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आली आहे.
अजय कंकडालवार यांनी कार्यक्रमात पुढे बोलतांना म्हणाले, १८५७ चे स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके ज्यांनी चंद्रपुर- गडचिरोली भागातील सावकार इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. गडचिरोली व चंद्रपुर येथील गोंड व इतर गैर गोंडियन समाजास सावरकरांच्या जाचातून त्यांच्या हूकूमशाही व अत्याचारातून सुटका करून देण्याकरिता वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी प्रत्येक समाजातील तरून युवकांना सोबत घेऊन जंगोम सेना तयार केली व सावकार आणी इंग्रजांच्या विरूद्ध लढाई सुरू केली. बाबुरावांना व जंगोम सेनेला भरपुर यश मिळाले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष संदीप कोरेत होते.
यावेळी उपस्थित शुभम शेंडे सदस्य ग्रामपंचायत गोमनी, अजु विर्मवा, गणेश तलांडे, अनिल दुबुळवर, निलेश ओल्लालवर, गीता चालूलकर, रोहित गलबले, राकेश कूडमेते, सतोश सीडाम, मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, प्रमोद गोडसेलवार, सचिन पांचर्या, अमित बेझलवारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli