महत्वाच्या बातम्या

 आजपासून जिल्ह्यात समता पर्वाचे आयोजन


- सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम

 - सप्ताहभर होणार विविध कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : संविधान दिन 26 नोव्हेंबर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर पर्यंत जिल्हयात सामाजिक न्याय विभागाच्यावतीने समता पर्व राबविण्या येत आहे. या पर्वानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाची लोकांमध्ये माहिती व्हावी, संविधानाचे महत्व त्यांना कळावे. त्यामुळे संविधान दिन 26 नोव्हेंबर पासुन हे पर्व सुरु होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यकत्‍ करण्यासाठी 6 डिसेंबर पर्यंत हे पर्व सुरु राहणार आहे. या निमित्त 26 नोव्हेंबर रोजी समाज कल्याण विभागाच्या सर्व शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे, निवासीशाळा, दिव्यांग शाळा, आश्रमशाळा याठिकाणी प्रभातफेरी काढण्यात येईल. तसेच शाळा व ठिकठिकाणी संविधानाचे वाचन व मार्गदर्शन केले जातील. हा कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे पार पडेल.
27 नोव्हेंबर रोजी शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येईल. 28 नोव्हेंबर रोजी अधिकार व कर्तव्य या विषयावर व्याख्यान होईल. 29 नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर सामाजिक न्याय भवन येथे कार्यशाळा होईल. 30 नोव्हेंबर रोजी संविधान या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात येईल. तसेच अनुसुचित जाती घटकासाठी कार्य करणारे समाज सेवक, कार्यकर्ते यांची कार्यशाळा घेतली जातील. 1 डिसेंबर रोजी जिल्हा स्तरावर युवा गटांची कार्यशाळा होईल.
2 डिसेंबर रोजी जिल्हयातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तींना भेटी देण्या येतील. 3 डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर तसेच तहसिलदार व गटविकास अधिकारी यांची कार्यशाळा होईल. 4 डिसेंबर रोजी जेष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी व वृध्द यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांच्या माहितीची कार्यशाळा होईल. 5 डिसेंबरला सांस्कृतिक कार्यक्रम होईल. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम तसेच  सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप, बक्षिस वितरण व समता पर्वाचा समारोप होईल, असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos