महत्वाच्या बातम्या

 स्त्री रुग्णालय गडचिरोली येथील बंद असलेले सिलिंग पंखे बाबत तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने दखल


- सदर विषयाच्या पाठपुरावा करताच बांधकाम विभागाने कारवाई करत तात्काळ पंखे सुरू करून दिले! 
 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : १ जून २०२६ गडचिरोली येथील स्त्री रुग्णालय येथे बंद असलेल्या पंखे बाबत येथील रुग्णालयात भरती असलेल्या व रुग्णाचे नातेवाईक उमेश वैरागडे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हा गडचिरोली कडे माहिती दिली व तक्रार केली या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार जिल्हा संघटनेने थेट स्त्री रुग्णालय गडचिरोली येथील शल्य चिकित्सक यांच्यासोबत संपर्क साधला व स्त्री रुग्णालय शल्य चिकित्सक किलनाके म्याडम यांनी माहिती दिले कि बांधकाम विभाग इलेक्ट्रिक डिपार्टमेंट त्यांच्याकडे संबंधित विषय प्रलंबित आहे. 

याची माहिती घेऊन संबंधित इलेक्ट्रिकल विभागाचे कार्यकारी अभियंता वर्मा म्याडम यांच्या सोबत संपर्क साधून सदर विषयाची चर्चा केली व त्यांनी थेट संबंधित कनिष्ठ अभियंता यांना सदर समस्या अवगत केले व तात्काळ संबंधित समस्या दूर करण्याचे निर्देश दिले व तात्काळ स्त्री रुग्णालय येथील पंखे सुरू केले  याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हा गडचिरोलीचे वतीने कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रमांक एक मा. साखरवाडे साहेब तसेच बांधकाम विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अभियंता मा. मोरे साहेब यांचे आभार मानण्यात आले आहे. 

व संबंधित स्त्री रुग्णालयातील बंद असलेले पंखे तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीची तात्काळ दखल बांधकाम विभाग (इले) डिपार्टमेंट यांनी घेऊन स्त्री रुग्णालय येथील पंखे सुरू केले याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ भारत खटी, राहुल भाऊ झोडे, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, गडचिरोली शहर अध्यक्ष गडचिरोली अध्यक्ष स्नेहा मेश्राम, राणी गोपशेट्टीवार, भूषणा खेडेकर,विशाखा सिंह, लीना विस्वास,जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये,कृष्णा वाघाडे,गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, दीपक सातपुते,दिनेश मुजुमदार यांनी बांधकाम (इले )विभागाचे आभार मानले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos