विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या हस्ते ब्रम्हपुरी शहरातील ६ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
- ब्रम्हपूरी शहरातील टिळकनगर, क्रिष्णा काॅलनी, सम्राट अशोक चौकाचा समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ब्रम्हपूरी : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी मतदारसंघात विकासाचा झंझावात सुरू केला असून मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रगतीपथावर आहेत. तर मंजूर झालेल्या व पुर्णत्वास आलेल्या ब्रम्हपूरी शहरातील रस्ते व नाल्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.
या भूमिपूजन झालेल्या विकासकामांमध्ये विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत सम्राट अशोक चौक ते राजु ढोरे ते बाजार चौक ते धुम्मनखेडा ते जूना नाका वडसा रोड पर्यंत डांबरीकरण, जुनी नगरपरिषद परिसरात डांबरीकरण करणे, पंजाबराव देशमुख चौक ते शितलामाता मंदिर पर्यंत डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक १० मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण व नाली बांधकाम करणे अशा ६ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजनांचा यामध्ये समावेश आहे.
यावेळी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, नगराध्यक्षा सौ रिताताई उराडे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अशोक रामटेके, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक हितेंद्र राऊत, न.प. आरोग्य सभापती दिपक शुक्ला, न.प. नियोजन सभापती महेश भर्रे, नगरसेविका सरिताताई पारधी, किशोर आमले, सुमीतभाई, चंद्रपूरचे माजी नगरसेवक नंदु नागरकर यांसह अन्य काॅंग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रभागातील नागरिकांसोबत चर्चा करीत त्यांच्या समस्यांचे निराकरण व गावातील पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत विकास आराखडा देखील तयार केला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.
News - Chandrapur