महत्वाच्या बातम्या

 क्रीडा क्षेत्रात युवकांनी नाव लौकिक करावे : माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम


- माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते मूलचेरा तालुक्यातील मलेझेरी येथे भव्य कबड्डी सामन्यांचे उदघाटन संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मूलचेरा : तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलेझेरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम तथा क्रीडा प्रसारक मंडळ तथा वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कबड्डी सामने मलेझेरी येथील पटांगणात आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी उदघाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री .राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले कबड्डी या खेळाने युवा स्वतः प्रगती करू शकतो आपलं भविष्य बनवू शकतो आणि आपल्या क्षेत्राचं नाव उंचावर नेऊ शकतो. मी आजपर्यंत आपल्या क्षेत्रातील युवा वर्गाला प्रत्येक खेळासाठी प्रोत्साहन देत असतो, युवा वर्गाला सहकार्य करत असतो, क्रीडा क्षेत्रात युवकांनी नावं लौकिक करावं, आणि युवा वर्गाने सामाजिक कार्यात सदैव समोर यावं मी आपल्या सोबत आहो माझ्याकडून मी सर्वोतोपरी सहकार्य करत राहीन असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच मलेझेरी या गावात युवा वर्गाला खेळण्यासाठी क्रीडा संकुलची गरज आहे. त्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करीन, महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षम बनल्या पाहिजेत त्यासाठी सुद्धा प्रयत्न करीन असे मत त्यांनी यावेळी दिले. यावेळी मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी कबड्डी स्पर्धेचा थोडासा आनंद खेळाडू समवेत घेतला. खेडे भागात अतिशय लोकप्रिय असलेल्या या दमदार स्पर्धेत सहभागी झालेल्या संघ, खेळाडू व कबड्डीचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षक वर्गास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बादल शहा जिल्हा सचिव भाजपा, प्रकाश दत्ता तालुका अध्यक्ष भाजपा, बिधान वैद्य महामंत्री बंगाली आघाडी, सुभाष गणपती जिल्हा महासचिव, वामनराव कंनाके, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, युवा नेते गणेश घारघाटे, प्रकाश कंनाके हे उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos