पौष्टिक तृणधान्य पासून तयार केलेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा व महिला मेळाव्याचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सन २०२३ हे पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, या प्रमुख तृणधान्य पिकाचा तर नाचणी, भगर, कोंद्रा, राळा, सावी, राजगीरा या लघु पौष्टिक तृणधान्याचा पिकाचा समावेश होतो. आहाराच्या बदलत्या सवयीमुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहेत. आहाराच्या दृष्टिने समतोल आहार घेण्याची शिफारस आहार तज्ञ करीत असतात.
वरील तृणधान्यामधील पोषणमुल्यामुळे त्यांना आहारामध्ये अनन्यसाधारण महत्व असून त्यांची गणना पौष्टिक तृणधान्य अशी करण्यात आली आहे. या पिकांचे लोकांच्या आहारातील त्यांचे नियमीत प्रमाण वाढविण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यास्तव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा व महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने २१ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी १०.०० वाजता सामाजीक न्याय विभागाचे सभागृहात महिला मेळावा व पाककला स्पर्धा आयोजीत केली आहे.
याकरीता जिल्हयातील इच्छुक स्पर्धकांनी मोठया प्रमाणात या स्पर्धेत सहभागी व्हावे, अधिक माहिती करिता भावना लांजेवार ९४०४२२०५१४ व जीवन ढगे ९४०३३२४१३९ यांच्याशी संपर्क करावा. विजेत्या स्पर्धकास बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. करीता त्यांनी त्यांच्या नावाची नोंदणी तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी/ कर्मचारी यांचेकडे करावी असे आवाहन डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.
News - Bhandara