महत्वाच्या बातम्या

 खाजगी बसच्या भीषण अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी


- अपूर्ण कामामुळे झाला अपघात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / शेगाव : खामगांव महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे खामगाव शेगाव दरम्यान लासुरा फाटा येथे एका खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. अपघात इतका भीषण होता की खाजगी प्रवासी बसणे तीन पलट्या खाऊन ही बस बाजूच्या नाल्यात पडली आहे. ही बस शेगावहून उज्जैन येथे जात होती. सकाळी सकाळी हा अपघात झाल्याने या ठिकाणी मदतीसाठी कोणी धावून आला नाही. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी वाहने थांबून सदर बसमधील प्रवाशांना बाहेर काढले व खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

  Print


News - Rajy
Related Photos