बंगाली समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा : आमदार डॉक्टर देवराव होळी
- बंगाली समाजाच्या आरक्षणासंदर्भात आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी घेतली बार्टीच्या संचालकांची भेट
- बंगाली समाजाच्या झालेल्या सर्वेक्षणाचे रिपोर्ट लवकरात लवकर पाठवण्यात यावे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : बंगाली समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा व बंगाली समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी बार्टीचे महासंचालक डॉक्टर गजभिये यांची पुणे येथे भेट घेऊन केली. यावेळी प्रामुख्याने निखील भारतचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव प्राचार्य श्री विधान व्यापारी, भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, बंगाली आघाडी जिल्हा महामंत्री विधान वैद्य, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे आदी उपस्थित होते.
या भेटी दरम्यान आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी बंगाली समाजाची मागील अनेक दिवसांपासूनची असलेली मागणी अजून पर्यंत पूर्ण न झाल्याने खंत व्यक्त केली. बार्टीचे संचालक डॉ. गजभिये यांना भेटुन बंगाली समाजाच्या आरक्षणासंदर्भात असलेली गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली. यावेळी संचालक यांनी त्याला उत्तम प्रतिसाद देत लवकरात लवकर रिपोर्ट बनवून पाटवण्यात येईल अशी हमी दिली आणि लवकरच एक टीम गडचिरोलीला पाठवून कार्यक्रम घेण्यात येईल असेही सांगितले. बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा यांनी या बैठकीसाठी विशेष पुढाकार घेतला होता. वेळात वेळ काढून पुणे येथे बंगाली समाजाचे काही प्रतिनिधीला बोलवून बैठक लावल्यामुळे संपूर्ण बंगाली समाजा तर्फे माननीय आमदार डॉ. देवराव होळी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
News - Gadchiroli