महत्वाच्या बातम्या

 चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या : पतीला जन्मठेप


विदर्भ एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर चाकूने वार करून खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना कोठारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा कुडेसावली येथे १२ सप्टेंबर २०२४ रोजी घडली होती.

प्राप्त माहितीनुसार, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुडेसावली येथील आरोपी धनपाल माधव रामटेके (वय ६७), रा. याने पत्नी वंदना धनपाल रामटेके (वय ६०) हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर चाकूने वारकरून तिचा खून केला होता. याप्रकरणी फिर्यादी अमर धनपाल रामटेके याच्या तक्रारीवरून कोठारी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १४०/२०२४ अंतर्गत कलम १०३(१), ३५१(७) बीएनएस तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सपोनि योगेश बरसान यांनी केला. प्रकरणाचा खटला जिल्हा व न्यायालय चंद्रपूर येथे चालला. या प्रकरणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी जन्मठेप ची सजा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड आसिफ शेख यानी काम पाहिले, तर आरोपीच्या बाजूने ॲड. रंगारी यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून मपोअं मनीषा गोवर्धन चिवंडे यांनी काम पाहिले.

सुनावणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी, रासायनिक विश्लेषण अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. उपलब्ध सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी धनपाल रामटेके याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos